Ad will apear here
Next
महापालिकेकडून तत्परतेने मिळालेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा

पुणे : पुराचा फटका बसलेल्या नदीकाठच्या भिडे पूल परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेतर्फे रोख रक्कम आणि अन्नधान्याची मदत देण्यात आली आहे. शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून तत्परतेने मिळालेल्या या मदतीमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे धरणातील विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आणि हे पाणी नदीकाठी असलेल्या वस्तीतील अनेक घरांमध्ये शिरले. विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नागरिकांन मौल्यवान सामान हलवण्याबाबत आणि सुरक्षित स्थळी आसरा घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी शक्य ते साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले होते; मात्र सर्व सामान हलवणे शक्य न झाल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे, अन्नधान्याचे नुकसान झाले. घरांचेही नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनातर्फे तत्काळ पाहणी करून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. ही मदत कधी मिळेल, याची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अवघ्या पंधरा-वीस दिवसात मदत मिळाली आहे.

 

पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आवश्यक ओळखपत्रे घेऊन नागरिकांना वस्तीतील सभागृहात जमण्यास सांगितले आणि तिथे सर्वांना अन्नधान्याच्या मदतीचे वाटप करण्यात आले, तर पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत नागरिकांच्या थेट बँक खात्यात जमा झाली आहे. या कामात या भागातील नगरसेवक दीपक पोटे यांनी पुढाकार घेतला. वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर येथील नागरिकांनी जवळच्या शाळेत आश्रय घेतला होता. त्या वेळीदेखील त्यांना तातडीने अन्नधान्य व अन्य सेवासुविधा पुरविण्यात आल्या होत्या. 

‘सरकारने दिलेली ही मदत खूप मोलाची आहे. घराची दुरुस्ती, आवश्यक सामान आणण्यासाठी ही रक्कम उपयोगी येणार आहे,’ अशी प्रतिक्रिया या वस्तीतील केटरिंगचा छोटासा व्यवसाय चालवणाऱ्या मनीषा दहीभाते यांनी व्यक्त केली. 

वेळेत झालेल्या या मदतीमुळे वस्तीतील नागरिक प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZWICE
Similar Posts
कॅटलिस्ट फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत पुणे : ‘पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कॅटलिस्ट फाउंडेशन वस्तू रुपात मदत गोळा करून देणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता पुणे : पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, पूरग्रस्तांना शासनासह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवली जात आहे. या भागातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार किट्सची गरज होती. त्यापैकी एक लाख पाच हजार किट्स उपलब्ध झाली आहेत
पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नागरिकांकडून मदतीचा ओघ; आणखी मदतीची गरज पुणे : पुराचा फटका बसलेल्या पुणे शहरातील सुमारे पाच हजार नागरिकांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांच्याकरिता पोळी-भाजी देण्याचे आवाहन महापालिकेच्या कर्मचारी सुप्रिया परदेशी यांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, माणुसकीचे हात संकटाशी सामना करण्यासाठी पुढे आले आहेत
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language